top of page
Writer's pictureMahannewsonline

कोरोना चाचणी दरम्यान स्वॅब स्टिक नाकात तुटली अन् अडकली....

देशातील करोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. देशभरात कोरोना चाचणी घेतली जात आहे. तेलंगणामधील करीमनगरमधील रामदुगु मंडलातील वेंकटरोपल्ली गावात रॅपिड अॅन्टिजेन टेस्टसाठी सरपंच जुवाजी शेखर यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी गावकऱ्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सर्वात अगोदर स्वतःची तपासणी करून घ्यायचे ठरवले, मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरला. कोरोना चाचणी दरम्यान स्वॅब स्टिक नाकातच तुटली आणि ती संरपंचांच्या घशात जाऊन अडकली, यामुळे सरपंचांना असह्य वेदना सुरू झाल्या होत्या. ही घटना शुक्रवारी घडली. आहे.

या प्रकारानंतर डॉक्टर व परिचारिकांनी त्यांच्या नाकातील तुटलेली स्टिक काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र यामध्ये त्यांना यश आले नाही. दुसरीकडे सरपंचांना असह्य वेदना होत असल्याने त्यांची प्रकृती बिघडू लागली, अखेर त्यांना करीमनगरमधील एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले व तिथं एंडोस्कोपी करून स्वॅब स्टिक काढली गेली.

डॉक्टरांनी सांगितलं आहे की, स्वॅब स्टिक नाकातून घसरून घशात जाऊन अडकली होती.या सर्व प्रकाराबद्दल सरपंच जुवाजी शेखर यांनी गावातील अप्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांबद्दल तक्रार देखील केली आहे.


bottom of page