top of page
Writer's pictureMahannewsonline

मोठी बातमी! रशियाकडून युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा

रशिया आणि युक्रेनमधील मोठी घडामोड समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली असून युद्धाचे ढग अजूनच गडद झाले आहेत. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतीन म्हणाले आहेत.

रशियाचे राष्ट्ररती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला शक्य तितक्या लवकर शस्त्रे टाकण्यास सांगितलं आहे तसे नाही केले तर युद्ध टाळता येणार नाही असंही पुतिन यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर या युद्धात हस्तक्षेप करणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, इतिहासात कधीच भोगावे लागले नाहीत अशा परिणामांना सामोरं जावं लागले. सर्व महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तुम्ही मला ऐकलं असेल अशी आशा आहे”. असा इशारा पुतीन यांनी इतर देशांना दिला आहे.



bottom of page