top of page
Writer's pictureMahannewsonline

"त्या" बैठकीला सचिन वाझेही उपस्थित

एनआयएची न्यायालयात माहिती

अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरेन हत्या या दोन्ही प्रकरणांचा तपास सध्या एनआयएकडून सुरू आहे. याप्रकरणी एनआयएने सचिन वाझे यांच्यासह काहींना अटक केली असून, त्यांची चौकशी केली जात आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट ज्या बैठकीत रचण्यात आला, तिथे वाझेही उपस्थित होते, अशी माहिती एनआयएने न्यायालयात दिली आहे.


मनसुख हिरेन प्रकरणासंदर्भात एनआयएने मंगळवारी विशेष न्यायालयात ही माहिती दिली. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट एका बैठकीत रचण्यात आला. त्या बैठकीला सचिन वाझे तसेच विनायक शिंदेही उपस्थित होते. तपास यंत्रणा हत्येमागील कटाचा आणि त्याच्या उद्देशाच्या खूप जवळ पोहचली असल्याचं एनआयएच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. एनआयएच्या युक्तीवादानंतर विनायक शिंदे आणि नरेश गोर यांच्या एनआयए कोठडीचा कालावधी ७ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला.


bottom of page