top of page
Writer's pictureMahannewsonline

परमबीर सिंग यांच्या आग्रहामुळेच वाझेंची नियुक्ती

तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आग्रहामुळेच सह आयुक्तांना सचिन वाझेंची नियुक्ती गुन्हे शाखेतील गुन्हेगार गुप्तवार्ता कक्ष(सीआययू) या अत्यंत महत्त्वाच्या विभागात नाइलाजास्तव करावी लागली. अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह विभागाला दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

गृह विभागाने वाझे यांच्या नियुक्तीसह अन्य मुद्द्यांवर माहिती सादर करण्याचे आदेश आयुक्तांना दिले होते. सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या वाझे यांच्याकडे सीआययूच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यास तत्कालीन सह आयुक्तांनी कडाडून विरोध केला होता. मात्र सिंग यांनी आग्रहाने वाझेंची नियुक्ती या विभागात करून घेतली. तत्पूर्वी सिंग यांनी भविष्यात गुन्हे शाखेतील वरिष्ठ निरीक्षक, प्रभारी निरीक्षकांची बदली, नियुक्ती आयुक्तांच्या पूर्वसंमतीनेच केली जावी, असे लेखी आदेश सह आयुक्तांना दिले. त्यामुळे वाझेंच्या नियुक्तीबाबत सह आयुक्तांचा नाइलाज झाला, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.


bottom of page