top of page
Writer's pictureMahannewsonline

सचिन वाझे पोलीस सेवेतून बडतर्फ

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर दोन महिन्यानी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याप्रकरणी आदेश काढले आहेत. ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले होते. मात्र मनसुख हिरेन हत्याप्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर, त्यांना आता पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.

२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पियो कार आढळून आली होती.तर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह यानंतर काही दिवसांनी म्हणजेच ५ मार्च रोजी कळव्यातल्या खाडीमध्ये सापडला होता. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला. या दोन्ही प्रकरणातल्या आरोपांवरुन वाझे यांना एनआयएकडून अटक कऱण्यात आली होती. त्यानंतर त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं. वाझे यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.


bottom of page