top of page
Writer's pictureMahannewsonline

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता चांगलीच चुरशीची होणार असल्याचे बोललं जात आहे. समाधान आवताडे यांना आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

समाधान आवताडे यांनी २०१४ ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर २०१९ ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दोन्ही वेळेस समाधान आवताडे यांनी चांगली टक्कर यांना ५५ ते ६० हजारच्या दरम्यान मते मिळविली होती. आमदार प्रशांत परिचारक यांनी समाधान आवताडे यांना पाठिंबा देत निवडणूक एकदिलाने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींनी परिचारक व आवताडे यांच्यात मनोमिलन घडवून आणले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आला नसला तरी भगीरथ भालके यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. भगीरथ भालके यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांच्यानंतर परिचारक गट प्रबळ मानला जातो. आता या निवडणुकीत परिचारक गट आवताडे यांच्या मागे राहील असे दिसते. यामुळे या पोट निवडणुकीत भालके यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहू शकते.


मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा निवडणुकीत भालके, आवताडे यांच्यासह स्वाभिमान शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, शैला गोडसे, वंचित बहुजन आघाडी, एम आय एम, यांचेही उमेदवार रिंगणात असणार आहेत. यामुळे ही लढत अटीतटीची होणार असल्याचे बोलले जात आहे.



bottom of page