top of page
Writer's pictureMahannewsonline

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांचं आमरण उपोषण सुरू; राज्य सरकारवर साधला निशाणा आणि म्हणाले...

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी आजपासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. माझा लढा ३० टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी आहे. आरक्षणासोबतच इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा लढा आहे”, असं संभाजीराजे यावेळी म्हणाले.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आजपासून आमरण उपोषणला सुरूवात केली. यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, आपला लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी असल्याचं नमूद केलं आहे. “सगळ्यांना एका छताखाली कसं आणता येईल, या दृष्टीने माझा लढा आहे. माझा लढा ३० टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी आहे. त्यांच्या आरक्षणासोबत इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा लढा आहे”, असं ते म्हणाले.

“मी २००७ पासून महाराष्ट्र फिरतोय. आरक्षण समाजाला का गरजेचं आहे याची जनजागृती केली होती. २०१३ ला मी महाराष्ट्रात फिरत असताना मराठा समाजाच्या संघटनांनी एकत्र येऊन सांगितलं की राजे तुम्ही नेतृत्व करणं गरजें आहे. त्यामुळेच २०१३ला आझाज मैदानात आम्ही मोर्चा काढला होता.”, असं ते म्हणाले.


bottom of page