top of page
Writer's pictureMahannewsonline

सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय...

मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलेल असताना भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज एक खळबळजनक ट्वटि करत, राज्य सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे, असा आरोप केला आहे.

मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एक तर त्यांनी ६ जूनपर्यंत निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. खासदारकीचाही राजीनामा देऊ, बहुजन समाजाची इच्छा असेल तर वेगळा पक्ष काढू, असे संभाजीराजे म्हणाले होते. त्यानंतर आज “सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?” असं संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.


त्यांच्या या ट्विटनंतर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. तर काहींनी ‘केंद्र की राज्य शासन पाळत ठेवत आहे हे स्पष्ट करा' असेही म्हंटले आहे.




bottom of page