संस्कार भारतीचा गुरुसन्मान सोहळा 28 जुलै रोजी
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून संस्कार भारती चंद्रपूर तर्फे रविवार, दि. 28 जुलै रोजी गुरु सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता भवानजी भाई चव्हाण हायस्कूल येथे हा सोहळा होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सौ नंदिनीताई देवईकर यांची उपस्थिती राहणार आहे. जागतिक कीर्तीचे चित्रकार व रांगोळीकार प्रल्हाद ठक यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.
या निमित्ताने ऋतू हिरवा हा पाऊस गीतांचा कार्यक्रम संस्कार भारतीचे पदाधिकारी व सदस्य सादर करणार आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कार भारती चंद्रपूर तर्फे करण्यात आले आहे.