top of page

शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेनेचे उपनेते आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पाटील यांच्यावर ही कारवाई केली गेल्याचं सांगण्यात आलं आहे.

शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये त्यांनी 'गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब' असं म्हटलं आहे. या शुभेच्छा देणं त्यांना भलतेच महागात पडले आहे.

कोण आहेत शिवाजीराव आढळराव पाटील?

पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी २००४, २००९, २०१४ मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यांना संसदरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे. मात्र,२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला. हा पराभव आढळराव पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला गेला.



bottom of page