top of page
Writer's pictureMahannewsonline

पुलाचा भराव वाहून गेल्याने सातारा - महाबळेश्वर रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

गेल्या दोन दिवसापासून महाबळेश्वरसह साताऱ्यात जोरदार पाऊस सुरु आहे. सातारा- मेढा- महाबळेश्वर रस्त्यावर चारपदरीकरणाचे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी पडलेल्या पावसाने ओढ्या नाल्यांना पाणी आल्याने जावळी तालुक्यातील मांमुर्डी गावानजीकचा सातारा महाबळेश्वरला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा भराव वाहून गेल्याने साताऱ्यातून मेढामार्गे महाबळेश्वरला जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावरुन होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

महाबळेश्वर, पाचगणी, वाईसह सातारा परिसरात बुधवार दुपारपासून सुरु झालेला पाऊस रात्रभर जोरदार सुरु होता. पावसाने ओढ्या नाल्यांना पाणी आले. या मार्गावर रस्ता दुरुस्तीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी रस्त्यासाठी टाकण्यात आलेला भरावही खचून वाहून गेला.मामुर्डी गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या कामाच्या इथं पाणी मोठया प्रमाणात साचले होते त्यातच पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने भराव वाहून गेला. रस्ता वाहून गेल्याने सातारा केळघर महाबळेश्वर रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद झाला. त्यामुळे केळघरला जाणाऱ्यांना मेढामार्गे पर्यायी रस्ता म्हणून मोहाट- म्हाते- सावली मार्गेने जाण्याचे निर्देश देण्यात आलेत. सर्व वाहतुक या मार्गाने वळण्यात आली आहे.

साताऱ्याहून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी मेढा मोहाट पुलावरून म्हाते मार्गे केळघर, महाबळेश्वर असा प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे. वारंवार सूचना करूनही ठेकेदाराने वेळेत काम न केल्याने पुलाचा भराव वाहून गेला आहे.


bottom of page