top of page
Writer's pictureMahannewsonline

काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध, अमल महाडिकांचा उमेदवारी अर्ज मागे

राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधान परिषदेच्या जागेवर अखेर काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. अमल महाडिक यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट दिल्लीवरुन फोन आल्यानं त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांची नवी दिल्लीत बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूका बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांनी धनंजय महाडिक यांना फोन करून अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना केली. यानंतर महादेवराव महाडिक यांच्या सोबत चर्चा झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याचे निश्चित करण्यात आले.


bottom of page