top of page
Writer's pictureMahannewsonline

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सॉंग सिटी मराठीचे नवे गाणे ‘सावळे सुंदर रूप मनोहर’

ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड पहिल्यांदाच दिसणार अल्बम सॉंग मध्ये

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ या मराठी गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. वारकऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातील उत्कट भावना ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ या गाण्यातून उलगडण्यात आल्या आहेत. या अप्रतिम गाण्याची निर्मिती सॉंग सिटी मराठी आणि शशिकांत वळतकर यांनी केली आहे. अजित पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या या सुंदर अशा गाण्यांचे वैशिष्ट्ये म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड या गाण्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच एका अल्बम सॉंग मध्ये दिसणार आहेत.

‘सावळे सुंदर रूप मनोहर’ हे सॉंग सिटी मराठी आणि शशिकांत वळतकर यांची निर्मिती असलेले ह्रदयस्पर्शी गाणे ‘संगीत मराठी’ या वाहिनीवर आणि ‘सॉंग सिटी मराठी’ या यूट्यूब चॅनलवर रसिकांना बघायला मिळणार आहे. दिग्दर्शक अजित पाटील आणि त्यांच्या टीमने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे हे गाणे अतिशय कमी कालावधीत पूर्ण केले आहे.

अभिनेते दीपक देऊळकर यांच्या संकल्पनेतून संगीतकार श्रीकृष्ण चंदात्रे यांनी ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ हे गाणे संगीतबद्ध केले आहे, सोनाली चंदात्रे यांनी आपल्या सुमधुर आवाजात रसिकांना मंत्रमुग्ध करणारे गीत गायले आहे. या गाण्यांचे कलादिग्दर्शन वैभव शिरोळकर, छायांकन साईनाथ माने यांनी केले असून संकलन अमोल निंबाळकर यांनी केले आहे. अजित पाटील एन्टरटेनमेंटने प्रोडक्शन ची धुरा सांभाळली आहे. तर मेकअप पल्लवी तावरे यांनी केले असून प्रसिद्धी सिद्धांत मीडिया अँड पब्लिसिटी यांची आहे.


bottom of page