top of page
Writer's pictureMahannewsonline

महापालिका निवडणुकीत कोणतीही आघाडी झाली तरीही जनता भाजपबरोबरच - आ. सुभाष देशमुख

सोलापूर : आगामी महापालिका निवडणुकीत कोणतीही आघाडी झाली तरी जनता निश्चित भारतीय जनता पक्षाबरोबर राहणार आहे. गेल्या या पाच वर्षात आम्ही अनेक कामे केली आहेत. त्याची कदर जनता निश्चितच करेल असे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले. जि. प. सदस्य अण्णाराव बाराचारे यांच्या शेतात आयोजित हुरडा पार्टीमध्ये ते बोलत होते.

आमदार देशमुख पुढे म्हणाले की, काही काळ वगळता अनेक वर्षांपासून महापालिकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. हद्दवाढ भागाचा विचार करता तीस वर्षात जेवढा निधी काँग्रेस-राष्ट्रवादीने दिला नाही त्यापेक्षा जास्त निधी आम्ही गेल्या सहा वर्षात दिला आहे हे जनता कधीही विसरणार नाही. एक नेता आपला पक्ष आणि आपले महत्व वाढवण्यासाठी फिरत असतो,त्याने काही फरक पडत नाही. महापालिकेत कोणीही एकत्र आले आणि कोणाचीही आघाडी झाली तरी जनता निश्चित भाजप बरोबर असेल. सध्या महाविकास आघाडीचा दबाव जरी असला तरी जनतेने आपले मत आता ठरवले आहे ते निश्चितच भाजप बरोबरच असणार आहे, असेही आमदार देशमुख म्हणाले.



दुकानात वाईन विक्री करण्याचा निर्णय चुकीचा
राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतलेला हा पूर्णपणे चुकीचा आहे यामुळे लोकांचे संसार उध्वस्त होणार आहेत. खासदार शरद पवार यांनी हा निर्णय बदलला तरी चालेल असे सांगत एकप्रकारे या निर्णयाला विरोध केला आहे. अनेक  दुकानात वाईन विक्रीच्या नावाखाली दारू विक्री होण्याची शक्यता आहे. यामुळे महिलावर्ग संतप्त आहे.  त्यामुळे हा निर्णय शासनाने मागे घ्यावा, असेही आमदार सुभाष देशमुख म्हणाले.


bottom of page