top of page
Writer's pictureMahannewsonline

शिखर धवन-आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोट; आयेशाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाला आहे. सोशल मीडियावर आयेशा मुखर्जीने एक भावनिक पोस्ट लिहून घटस्फोटाशी संबंधित गोष्टी शेअर केल्या असून ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिखरने अद्याप या संदर्भात कोणतेही अधिकृतपणे स्टेटमेंट केलेलं नाही.

शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी या दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. आयेशा शिखरपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. तिला पहिल्या लग्नापासून दोन मुली आहेत. त्यानंतर 2014 मध्ये तिने धवनच्या मुलाला जन्म दिला. धवन आणि आयेशाचे लग्न झाले तेव्हा बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. पण धवनच्या आईने त्याला साथ दिली. ती त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली.

2020 मध्ये, त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला असल्याचा बातम्या आल्या. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. यासोबतच आयेशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शिखरचे फोटो काढून टाकले होते. मात्र धवनच्या अकाऊंटवर आयेशाचे फोटो आहेत.


आयेशा मुखर्जीने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहून घटस्फोटाबद्दल लिहिले आहे की, ‘ पहिल्यांदा घटस्फोट झाला, दुसऱ्या वेळी वाटतंय की खुप काही पणाला लागलं आहे. मला खुप काही सिद्ध करायचं होतं. त्यामुळं माझं लग्न दुसऱ्यांदा तुटलं हे फारच भयावह होतं. घटस्फोट हा शब्दही घाणेरडा होता, पण माझा दोनदा घटस्फोट झाला. एका शब्दाची इतकी ताकद मी घटस्फोटित असताना अनुभवली. पहिल्यांदा घटस्फोट झाला तेव्हा मी फारच घाबरलेले होते. मला वाटत होतं की मी अपयशी ठरले. मी त्यावेळी चुकीची होते. सर्वांची मान शरमेनं खाली घातली असं मला वाटत होतं. मी स्वार्थी होते अशी भावना मनात होती. आईवडिलांना मी निराश करतेय असं वाटत होतं. आपल्या मुलांना हिन वागणूक देतेय असं वाटलं. काही प्रमाणात मी देवाचाही अपमान केला असं वाटलं... खूपच वाईट शब्द होता घटस्फोट'.


आयेशानं लिहिलेल्या या पोस्टमधून घटस्फोट आणि त्यामुळं पुढे मिळणाऱ्या वेदनांना अधोरेखित करण्यात आलं आहे. एक घटस्फोटित म्हणून जगताना एका महिलेला कोणकोणत्या परिस्थितीतून जावं लागतं याचा खुलासा आयेशानं केला आहे. आयेशाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळं आता सर्वांचीच नजर शिखरच्या पोस्टकडे किंवा त्याच्या अधिकृत वक्तव्याकडे लागली आहे.


bottom of page