top of page

ब्लॅक मंडे : शेअर बाजार कोसळला

मुंबई : अमेरिकेतील वाढत्या चलनवाढीमुळे फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदरात मोठी वाढ केली जाण्याच्या चिंतेने जगभरातील भांडवली बाजारात मोठी घसरण झाली. भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज मोठ्या घसरणीसह झाली आहे. बाजार खुला होताच सेन्सेक्समध्ये १७०० अंकांची घसरण तर राष्ट्रीय शेअर बाजारात (निफ्टी) ५०० अंकांची घसरण पाहायला मिळाली. याचा मोठा फटका गुंतवणुकदारांना बसला आहे.

शुक्रवारी सेन्सेक्स १०१६ अंकांनी आणि निफ्टीत २७६ अंकांची घसरण झाली होती. शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात देखील मोठी घसरण झाली होती. त्याचे पडसाद आज भारतासह इतर आशियाई बाजारांवर उमटले. बँका, वित्तीय संस्था, ऑटो, फार्मा, मेटल या क्षेत्रात प्रचंड घसरण झाली आहे. विमा कंपनी एलआयसीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. आज सलग १० व्या दिवशी शेअर खाली आला असून तो ६७० रुपयांपर्यंत खाली आला आहे. सूचीबद्ध झाल्यापासून स्टॉकमध्ये घसरण होत आहे आणि दररोज विक्रमी निचांकी नोंदवली जात आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरते मूल्य, खनिज तेलाचे वाढते दर तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत असल्याचे शेअर दलालांचे म्हणणे आहे.


bottom of page