top of page

हॉटेलचं बिल देण्यापूर्वी हे वाचा; सर्व्हिस चार्ज देणे बंधनकारक नाही...

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सेवा शुल्क आकारण्याबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.कोणतेही हॉटेल आणि रेस्टॉरंट्स खाण्याच्या बिलावर सेवा शुल्क आकारु शकत नाहीत, असा निर्देश CCPA ने जारी केला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

CCPA ने आपल्या आदेशात म्हटले आहे की,ग्राहकाला सेवा शुल्क भरायचे आहे की नाही हे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. याबाबत रेस्टॉरंट्स सक्ती करू शकत नाहीत. कोणत्याही रेस्टॉरंटने सेवा शुल्क आकारल्यास, ग्राहक त्या रेस्टॉरंटविरुद्ध ग्राहक आयोगाकडे तक्रार करु शकतो. ते राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन क्रमांक १९१५ वर तक्रार करू शकतात. तसेच कोणत्याही हॉटेलने खाद्यपदार्थांच्या बिलात सेवा शुल्क जोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल,असा इशाराही देण्यात आला आहे.



bottom of page