top of page

शिंदे -फडणवीस दिल्ली दौऱ्यावर; मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिना निमित्त देशात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीतील नेत्यांशी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील आमदारांबरोबरच कार्यकर्त्यांचे मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागले असून.आता तरी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरतो का हे पाहण महत्वाचं आहे.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर येत्या ८ ऑगस्टला सुनावणी घेण्यात येणार आहे. या सुनावणीमुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला गेले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आजपासून दिल्ली दौऱ्यावर असल्याने आता तरी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरतो का हे पाहण महत्वाचं आहे.


bottom of page