top of page
Writer's pictureMahannewsonline

VIDEO : नीरजने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकताच गावस्करांनी नाचत गायलं गाणं..!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये २३ वर्षीय नीरज चोप्राने ८७.५८ मीटर लांब भाला फेकत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. अभिनव बिंद्रा नंतर वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा दुसरा भारतीय आहे. नीरज चोप्राच्या या कामगिरीनंतर पंतप्रधान, राष्ट्रपतीसह अनेकांनी नीरज चोप्रावर अभिनंदनाचा वर्षाव केला. क्रिकेट विश्वातूनही नीरजचे अभिनंदन होत आहे. नीरज चोप्राच्या विजयानंतर सुनील गावस्कर यांनी डान्स तर केलाच शिवाय त्यांनी गाणं ही गायले.

नॉटिंगहॅम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत समालोचन करताना गावस्करांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले. सामन्यादरम्यान, नीरज चोप्राला सुवर्णपदक मिळतानाचा सोहळा प्रसारित करण्यात आला. हे पाहून सुनील गावस्करांच्या आनंदाला सीमा उरली नाही. ‘मेरे देश की धरती’ हे गाणे गात ते नाचतानाही दिसले. यासोबतच त्यांनी स्टुडिओमध्ये जिलब्यांचे वाटपही केले.

माजी खेळाडू सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजन सिंग, सुरेश रैना यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी नीरज चोप्राच्या विशेष कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.


bottom of page