top of page
Writer's pictureMahannewsonline

नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद

१४ जवानांचे मृतदेह जंगलात सापडले


छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दलातील आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान २२ जवान शहीद झाले. दरम्यान, चकमकीनंतर कमीतकमी १५ जवान बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं होतं. रविवारी सकाळी बेपत्ता जवानांच्या शोधासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली असता १४ जवानांचे मृतदेह जंगलात सापडले आहेत.

सुकमा-विजापूर सीमाभागात बस्तरच्या दक्षिणेकडे जंगलात नक्षलवाद्यांचा मोठा अड्डा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलांचे संयुक्त पथकाने शुक्रवारी रात्री नक्षलविरोधी कारवाई हाती घेतली होती. यावेळी नक्षल्यांनी सुरक्षा जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला. प्रत्युत्तरात जवानांकडून गोळीबार करण्यात आला. जवळपास तीन तास चाललेल्या या चकमकीनंतर काही जवान बेपत्ता झाल्याचं समोर आलं होतं. सुरक्षा दलाने सुकमा आणि विजापूर सीमा परिसरात या जवानांच्या शोधासाठी शोधमोहीम हाती घेतली होती. या शोधमोहिमेदरम्यान बेपत्ता असलेल्या १४ जवानांचे मृतदेह जंगलात आढळून आले. नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान २२ जवान शहीद झाले असून तर १ जवान अजून बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या धुमश्चक्रीत तब्बल ३१ जवान जखमी झाले आहेत.


bottom of page