top of page
Writer's pictureMahannewsonline

फ्रान्सला मागे टाकत भारतीय शेअर बाजाराची सहाव्या स्थानी झेप

केंद्र सरकारने दूरसंचार आणि वाहन निर्मिती क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या अर्थ प्रोत्साहनामुळे बुधवारी पुन्हा सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर झेप घेतली. पहिल्यांदाच भारतीय शेअर बाजाराने फ्रान्सच्या शेअर बाजाराला पिछाडीवर टाकत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. वर्षभरामध्ये भारतीय शेअर बाजाराची २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भारतीय शेअर बाजाराचे एकूण मूल्य मंगळवारी रात्री ३ लाख ४ हजार ५५ ट्रिलियनवर पोहचलं. ब्लमुबर्गने दिलेल्या वृत्तानुसार फ्रान्स शेअर बाजाराच्या मूल्यापेक्षा भारतीय शेअर बाजाराचे मूल्य ३२ ट्रिलियनने अधिक आहे. जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या अमेरिकन शेअर मार्केटची किंमत ५१.३ ट्रिलियन डॉलर्स आहे. त्यानंतर चीनचं शेअर मार्केट (१२.४२ ट्रिलियन डॉलर्स), जपान (७.४३ ट्रिलियन डॉलर्स), हाँग काँग (६.५२ ट्रिलियन डॉलर्स) आणि युनायटेड किंग्डम (५.६८ ट्रिलियन डॉलर्स) हे पाच देश भारताच्या पुढे आहेत.


bottom of page