top of page
Writer's pictureMahannewsonline

शेअर बाजारात मोठी घसरण

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केल्यानंतर जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी भांडवली बाजारात प्रचंड घसरण झाली. गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला. या पडझडीत सेन्सेक्स २००० अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तब्बल ५८० अंकांनी कोसळला आहे.

बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये १४५७ अंकांची घसऱण झाली. तर निफ्टीतही ४०४ अंकांची घसण होऊनतो १६ हजार ६५९ अंकांनी सुरु होता. दोन्ही देशातील संघर्षाचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला. बँक निफ्टी, निफ्टी प्रायव्हेट बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फायनान्शिअल सर्विसेस, एफएमसीजी, आयटी इंडेक्स, मेटल, मीडिया, फार्मा, पीएसयू बँकसह सर्व इंडेक्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं दिसत आहे. एसबीआय, रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, टीसीएस, या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.


दुपारी १२.३० वाजेपर्यंत शेअर बाजाराची स्थिती ...


Nifty 50

​BSE Sensex

Open

16548.90

55418.45

High

​16705.25

55996.09

​Low

16453.65

​ 55147.73

​Prev. Close

​17063.25

57232.06


bottom of page