top of page
Writer's pictureMahannewsonline

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे आज निधन झालं. त्या ८८ वर्षांचं होत्या. आज ४ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. शशिकला यांचे सिनेसृष्टीत योगदान मोठे होते. प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करता करता त्यांनी खलनायिका म्हणून वेगळीच छाप पाडली. .त्यांनी १०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केलं.



सोलापुरातल्या एका सधन कुटुंबात जन्म झालेल्या शशिकला यांचं बालपण ऐशोआरामात गेलं. बालपणापासूनच त्यांना नृत्याची आणि अभिनयाची आवड होती. १९४७च्या जुगनू चित्रपटात दिलीप कुमार यांच्या बहिणीची भूमिका शशिकला यांनी साकारली. मात्र यानंतर काम मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. १९६२ साली आरती चित्रपटात निगेटिव्ह भूमिका शशिकला यांना मिळाली. आरती चित्रपटातील या खलनायिकेच्या भूमिकेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.


‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’, ‘जंगली’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ (२००३) इत्यादी. शशिकला यांच्या सिनेमातील योगदानासाठी भारत सरकारनं २००७ साली ‘पद्मश्री’ किताबाने गौरविलं. २००९ साली व्ही. शांताराम लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्डही त्यांना प्रदान करण्यात आला होता.





bottom of page