top of page

पंढरपूरवरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा अपघात; तीन ठार, ७ जण गंभीर

पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा परतीच्या प्रवासावेळी शेगावजवळ ( जि. बुलढाणा) मोठा अपघात झाला आहे. आज (२२ मे) सकाळी सहाच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी ही शहराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली. या अपघातात ३ भाविकांचा जागीच मृत्यू तर ७ गंभीर भाविक जखमी झाले आहेत.


स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. काही जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर या भाविकांना पुढील उपचारांसाठी अकोल्याला हलवण्यात आलं आहे. भाविक अगदी त्यांच्या घरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.



bottom of page