Video : शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती
टीम इंडियाचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. शिखर धवनने आज सकाळी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. शिखर धवनच्या या निर्णयनंतर धवनच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे. २०२२ मध्ये बांगलादेश विरुद्ध त्याने शेवटचा वनडे सामना खेळला होता.
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये शिखर धवन म्हणाला की, ‘आज मी अशा वळणावर उभा आहे की जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला फक्त आठवणी दिसतात आणि जेव्हा मी पुढे पाहतो तेव्हा मला संपूर्ण जग दिसते. भारतासाठी खेळण्याचे माझे नेहमीच एक ध्येय होते आणि ते पूर्ण झाले ज्यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे.’
शिखर धवन पुढे म्हणाला, “सर्वप्रथम माझे कुटुंब, माझे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा जी आणि मदन शर्मा जी यांच्या मार्गदर्शनाखाली मी क्रिकेट शिकलो. मग माझी टीम ज्यांच्यासोबत मी वर्षानुवर्षे खेळलो जिथे मला माझे कुटुंब मिळाले आणि तुम्हा लोकांचे समर्थन आणि प्रेम मिळाले. कथेत पुढे जाण्यासाठी पानं उलटावी लागतात असं म्हणतात, म्हणून मीही तेच करणार आहे. मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. आज माझ्या क्रिकेट प्रवासाला निरोप देताना देशासाठी खेळलो याचा मला अभिमान आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआय आणि डीडीसीएचे आभार मानू इच्छितो आणि माझ्यावर खूप प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानू इच्छितो.”
Recent Posts
See Allराष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली आज यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार...