top of page

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर प्राणघातक हल्ला; भाषण सुरू असताना झाडल्या गोळ्या

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर शुक्रवारी सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जपानच्या नारा शहरातील एका सभेत भाषण करत असताना आबे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या असून त्यात ते गंभीर जखमी झाले.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर शुक्रवारी सकाळी नारा शहरात हल्ला करण्यात आला.स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांच्या छातीत 2 गोळ्या लागल्या आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, ते उपचाराला कोणताही प्रतिसाद देत नाहीत. दरम्यान, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

शिंजो आबे यांच्यावर गोळीबार केल्याच्या घटनेनंतरचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. आबे यांच्यावर केलेल्या हल्ल्यानंतर परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता.

दरम्यान, शिंजो आबे यांनी २८ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. वैद्यकीय कारणास्तव आबे यांनी पंतप्रधान पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता.


bottom of page