top of page
Writer's pictureMahannewsonline

Tokyo Olympic: पी.व्ही. सिंधूचा सलग दुसरा विजय

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकममध्ये आणखी एका विजयाची नोंद केली. सिंधूने महिला एकेरीच्या सामन्यात हाँगकाँगच्या चेंयुग गँन यीचा दोन सेटमध्ये सहज पराभव केला असून भारताची पदकाची आशा पल्लवीत झाली आहे. सुरूवातीपासूनच सामन्यात बढत घेतलेल्या सिंधूचा हा टोक्यो ऑलिम्पिकमधील दुसरा विजय असून, तिने प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक मारली आहे.

सिंधूने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत सुरूवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली. सिंधूने पहिल्या सेटमध्ये २१-९ अशा फरकाने आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये एका क्षणी दोन्ही खेळाडू १४-१४ अशा बरोबरीत होत्या. त्याचवेळी सिंधूने चांगला खेळ करत दुसऱ्या सेटमध्येही आघाडी घेतली. सिंधूने दुसरा सेट २१-१६ अशा फरकाने आपल्या नावे केला. एकूण ३५ मिनिटं चाललेला हा सामना सिंधूने २१-९, २१-१६ अशा फरकाने जिंकला.


bottom of page