top of page
Writer's pictureMahannewsonline

सीतामाई तलावात पाणी आल्याने 500 एकर जमीन ओलीताखालीः आ. सुभाष देशमुख

मंद्रुपच्या विकासासाठी एमआयडीसी होणे गरजेचे : आ. सुभाष देशमुख

सोलापूर : मंद्रूप येथील सीतामाई तलावात कुरूल शाखा कालवा 52/ 720 कॅनॉलवरून पाईपलाईनद्वारे आणलेल्या पाण्यामुळे परिसरातील पाचशे एकर जमीन ओलिताखाली आणण्याचे समाधान वाटत आहे. आता मंद्रुपच्या विकासासाठी एमआयडीसी होणे गरजेचे आहे. एमआयडीसी झाल्यास युवकांच्या रोजगाराचा प्रश्‍न सुटून मंद्रूप तालुका करणे शक्य होईल, असे प्रतिपादन आ.सुभाष देशमुख यांनी केले.

कुरुल कॅनल फाटा येथे जमिनीतून पाईपलाईनद्वारे पाणी आणल्याने मंद्रूप येथील अमोगसिद्ध बन देवालय येथे आ. देशमुख यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी सरपंच कलावती खंदारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. या तलावात पाणी आणण्यासाठी आ. देशमुख यांनी सतत पाठपुरावा करत विशेष पाईपलाईन मंजूर करून घेतली आहे.

आ. देशमुख पुढे म्हणाले की, मंद्रुपच्या विकासासाठी एमआयडीसी होणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांनी राजकारण बाजूला ठेवून मंद्रुपच्या विकासासाठी आणि एमआयडीसीसाठी आपल्या जमिनी द्याव्यात. त्यामुळे वर्षभरात येथे एखाद्या मोठा उद्योग आणता येईल. यावेळी गुरुसिद्ध म्हेत्रे यांनी आ. देशमुख यांनी पाठपुरावा केल्यामुळेच सीतामाई तलावात पाणी आल्याचे सांगितले. यावेळी मंद्रूपचे सरपंच सौ. कलावती खंदारे, बाजार समिती संचालक अप्पासाहेब पाटील, गौरीशंकर मेंडगुदले, महासिद्ध मुगळे, गुरुसिद्ध म्हेत्रे, विश्वनाथ हिरेमठ, हनुमंत कुलकर्णी, गुरण्णा तेली, भीमाशंकर नरसगोंडे, प्रभाकर कोरे, यतीन शहा, पाठबंधारे विभागाचे क्षिरसागर व घोडके ग्रामसेवक नागेश जोडमोटे, तलाठी निंगप्पा कोळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


bottom of page