top of page

श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांतला पोलिसांनी घेतले ताब्यात

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर याला पोलिसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणात अनेक चित्रपट आणि टीव्ही स्टार्सची नावे समोर आली आहेत. आता या यादीत सिद्धांत कपूरचे नाव जोडले गेले आहे.

पोलिसांनी बंगळुरूमधील एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकला. ड्रग्ज सेवन केल्याचा संशय असलेल्या ३५ जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यात सिद्धांत कपूरसह ६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सिद्धांतने अंमली पदार्थांचे सेवन पार्टीला येण्यापूर्वी केले का हॉटेलमध्ये केले हे स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ड्रग्ज घेतल्याचा आरोपावरून पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतलं असून यात सिद्धांतचाही समावेश आहे.

दरम्यान, श्रद्धा कपूर किंवा तिचे वडील शक्ति कपूर यांनी या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


bottom of page