top of page

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर भर कार्यक्रमात चाकूने हल्ला

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर पश्चिम न्यूयॉर्कमध्ये जीवघेणा हल्ला झाला आहे. पश्चिम न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात व्याख्यानापूर्वी एका व्यक्तीने स्टेजवर चढून रश्दी यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेनंतर रश्दी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.

मुंबईत जन्मलेले आणि बुकर पुरस्कार विजेते सलमान रश्दी यांचे ‘द सॅटॅनिक व्हर्स” नावाच्या पुस्तकास इराणमध्ये १९८८ पासून बंदी घालण्यात आली आहे. इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी रश्दी यांच्या मृत्यूबद्दल बक्षीस देण्याचा फतवा जारी केला होता. जी व्यक्ती रश्दींची हत्या करेल त्याला त्याला ३ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सलमान रश्दी यांना यापूर्वी अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.



bottom of page