top of page
Writer's pictureMahannewsonline

सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2022 : प्रभाग रचना जाहीर ; जाणून घ्या तुमचा प्रभाग ...

सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकूण ३८ प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी जाहीर केली. यावर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी चार ऐवजी तीन सदस्यीय प्रभाग असणार आहेत. सध्या सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या १०२ आहे. त्यामध्ये वाढ होऊन ११३ नगरसेवक होणार आहेत.३७ प्रभागामध्ये तीन नगरसेवक तर एका प्रभागांमध्ये दोन नगरसेवक असणार आहेत.

जाहीर प्रभाग रचना व आराखड्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकत घेता येणार आहे. आलेल्या सूचना तसेच हरकतीवर सुनावणी होऊन याचा अहवाल २ मार्च पर्यंत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून अंतिम आराखडा व प्रभाग रचना जाहीर होणार आहे.



bottom of page