top of page
Writer's pictureMahannewsonline

सोलापूरजवळ कारचा भीषण अपघात; चार तरुणांचा जागीच मृत्यू

विजापूर-सोलापूर महामार्गावर सोलापूरजवळ भरधाव कर पुलाच्या कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात चार तरूणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला. हा अपघात पहाटे चारच्या सुमारास झाला.

याबाबत अधिक माहिती अशी, कर्नाटकातील सिंदगी (जि. विजापूर) येथील पाच तरूण कार (केए ३२ एन २४८४ ) ने पुण्याकडे जाण्यासाठी निघाले होते. कार भरधाव वेगात सोलापूरच्या दिशेने येत असताना कवठेगावाजवळ नवीन बाह्यवळणावरील पुलाच्या कठड्यावर जोरात आदळली. या अपघातात अरूण कुमार लक्ष्मण, महिबूब मोहम्मद अली मुल्ला, फिरोज सैफनसाहेब शेख आणि मुन्ना केंभावी या चौघा तरूणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक तरूण जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


bottom of page