top of page

उसतोड कामगारच निघाले दरोडेखोर

बोरामणी दरोडा प्रकरणातील सहा जणांना ग्रामीण पोलिसांनी केली अटक

सोलापूर : जिल्ह्यातील बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील हिरजे वस्तीवर काही दिवसांपूर्वी दरोडा टाकून वृद्ध इसमाचा खून करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास लावण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी ६ गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलं असून अन्य दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती केल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वैभव उर्फ भोरड्या एकनाथ काळे (रा. फकराबाद, जि. नगर) हा या टोळीचा म्होरक्या आहे. तर अजय देवगण उर्फ देवगण सपा शिंदे, सुनिल उर्फ गुल्या सपा शिंदे (दोघेही रा. शेळगाव, ता. परांडा), ज्ञानेश्वफर लिंगु काळे (रा. पांढरेवाडी, ता. परांडा), विकास नागेश भोसले (रा. डोकेवाडी, ता. भूम), संतोष झोडगे (रा. डोकेवाडी, ता. भूम) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नाव आहेत. संतोष झोडगे वगळता सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तर अक्षय काळे, अनुज भोसले हे दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.


बोरामणी-दर्गनहळ्ळी येथे ९ मार्चच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गावातील शरणप्पा पाटील यांच्या घरावर दरोड्याचा या टोळीने प्रयत्न केला होता. दरोड्याचा पहिला प्रयत्न फसल्यानंतर या दरोडेखोरांनी काही अंतरावर राहणाऱ्या हिरजे यांच्या घरावर दरोडा टाकत दहशत माजवली होती. चा प्रय़त्न केला. यामध्ये सुलोचना हिरजे यांच्या गळ्यातील दागिने दरोडेखोरांनी हिसकावून घेतले. यावेळी दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या बाबुराव हिरजे या वृद्ध व्यक्तीवर हल्ला केला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. बाबुराव हिरजे यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून त्यांच्या पत्नी सुलोचना हिरजे यांचे हात-पाय बांधून दरोडेखोरांनी पळ काढला होता. या घटनेची संवेदनशीलता ओळखून कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी देखील घटनास्थळी जाऊन भेट दिली.

पोलिसांच्या तपासात बोरामणी-दर्गनहळ्ळी गावात उसतोड कामगारांची एक टोळी येऊन गेल्याचे लक्षात आले. हाच धागा पकडून पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये उसतोड कामागार कोण आहेत याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच घटनेतील साक्षीदारांकडून आरोपींचे स्केच तयार करुन घेण्यात आले. गुन्ह्याचा तपास सुरु असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील उसतोड करणाऱ्या टोळीतील मजूर या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या संशियाताला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर इतरही आरोपींचा सुगावा पोलिसांना लागला. नगरमधील जामखेड तालुक्यातून दोन, बीडमधील वाडवान येथून एक, पुण्यातील लोणीकाळभोर येथून दोन तर उस्मानाबादच्या भूम येथून एक अशा सहाही आरोपींना पोलासांच्या चार पथकांनी ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान ज्या शरणप्पा पाटील यांच्या घरावर पहिल्यांदा दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांच्यासोबत उसतोड करताना आरोपींपैकी एकाचे वाद देखील झाल्याचे समोर आले आहे. त्याच वेळी ह्या दरोड्याचा प्लॅन ठरला असल्याची माहीती समोर येत आहे.


bottom of page