top of page
Writer's pictureMahannewsonline

आश्चर्य! चक्क शरीराला चिकटायला लागले स्टील आणि लोखंड ...

एखाद्याच्या अंगाला वस्तू चिकटत असतील तर त्याचा लसीशी काही संबंध नााही- तात्याराव लहाने


नाशिक : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. .. पण हीच लस घेतल्यानंतर तुमच्या शरीराला चुंबकत्व आले आणि शरीराला वस्तू अचानक चिटकायला सुरूवात झाली तर....सर्वाना आश्चर्याचा धक्का बसणारच. हो अगदी बरोबर आहे. असाच एक प्रकार नाशिकच्या सिडको भागात घडला आहे. कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतल्यावर नाशिकमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाच्या शरीराला चुंबकत्व निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. त्यांचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सिडको परिसरात शिवाजी चौकात राहणारे 71 वर्षीय अरविंद जगन्नाथ सोनार यांनी नुकताच कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतला. लस घेतल्यावर चुंबकत्व निर्माण होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिल्यानंतर त्यांच्या मुलाने सहज त्यांच्या वडिलांच्या शरीरावर प्रयोग करून पाहिला असता घरातील लोखंडाच्या आणि स्टीलच्या वस्तू, नाणे चमचे शरीरावर चिकटून राहात असल्याचे लक्षात आले.

याबाबत त्यांनी डॉक्टरांना विचारले असता नाशिकमध्ये असा प्रकार पहिल्यांदाच घडला असल्याने आश्चर्य व्यक्त करत याबाबत आम्हालाही काही माहिती नाही असे सांगितले. कुठल्याही धातूच्या वस्तू थेट शरीरावर चिटकत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांचा व्हीडीओ व्हायरल झाल्यावर माध्यमांनी दखल घेत शहानिशा केली. दरम्यान, या संदर्भात तपासणी करूनच प्रतिक्रिया देऊ असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.


दरम्यान, राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने यांनी एखाद्याच्या अंगाला वस्तू चिकटत असतील तर त्याचा लसीशी काही संबंध नााही. त्यांच्या त्वचेशी संबंधित एखादी गोष्ट असू शकते जे तपासणीनंतर स्पष्ट होईल, असं सांगितलं.


bottom of page