top of page
Writer's pictureMahannewsonline

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसर्‍यांदा कोरोनाची लागण...

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असूनही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

या अगोदर मार्च महिन्यात विभागीय आयुक्त सौरभ राव यांना कोरोनाची लागण झाली होती. तर, कोरोनावरील पहिली लस घेतल्यानंतर अगदी काही दिवस होत नाही, तोच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातून बाहेर पडून, प्रशासकीय कामाला देखील त्यांनी सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी लसीचा दुसरा डोस शुक्रवारी घेतला होता. त्यामुळे त्यांना ताप आल्याने, सौरभ राव यांनी पुन्हा कोरोनाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांचा कोरोना अहवाल पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आला. दररोज प्रशासकीय बैठक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत प्रत्येक आठवड्याला आढाव बैठक होत असल्याने, आता सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे.


विभागीय आयुक्त अनेक महत्वाच्या निर्णय आणि नियोजनामध्ये सक्रिय होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बैठकीला उपस्थितही होते. सोमवारीही कार्यलायात बैठकीसाठी उपस्थित असल्यामुळे संपर्कात आलेल्या आधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे


bottom of page