top of page

…अन् आमदार शहाजीबापूंनी ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर घेतला भन्नाट उखाणा

“काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” या सवांदामुळे अल्पवाधित लोकप्रिय झालेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील आपल्या पत्नीसमवेत झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमामध्ये नुकतेच सहभागी झाले होते. आपल्या गावरान आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे शहाजीबापूंनी आपल्या पत्नीच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत उखाणा घेतल्याचं पहायला मिळालं. या उखाण्याला कार्यक्रमाचे सुत्रसंचालक निलेश साबळेंपासून ते स्वप्नील जोशीनेही टाळ्या वाजवत दाद दिली. विशेष म्हणजे हा उखाणा ऐकून शहाजीबापूंच्या पत्नीही हसून लाजल्याचं पहायला मिळालं.

विशेष म्हणजे यावेळेस शहाजीबापूंनी खास उखाणाही घेतल्याचं पहायला मिळालं. मातीशी नाळ जोडलेला नेता ही ओळख जपणारा उखाणा घेताना शहाजीबापूंनी सांगोल्यातील नदीच्या नावाचं यमक आपल्या पत्नीचं नाव घेताना जुळवल्याचं पहायला मिळालं. पत्नी रेखाचं नाव घेताना शहाजीबापूंनी, “माझ्या दुष्काळाला पाणी देण्याऱ्या नदीचं नाव आहे माण अन् रेखा माझी जान” असा खणखणीत उखाणा घेतला. हा उखाणा ऐकून रुपाली ठोंबरेंसहीत किशोरी पेडणेकर यांनाही हसू आलं. तर स्वप्नील जोशीने ‘एक नंबर’ असं म्हणत या उखाण्याला दाद दिल्याचं पहायला मिळालं. या कार्यक्रमाचा हा विशेष भाग १८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

शहाजी बापू गुवाहाटीमधून सांगोल्यामध्ये परतल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर रेखा यांनी उखाणा घेतला होता. “असेल तिथे मुलीनं नम्रतेनं वागावे, शहाजीबापूसारखे पती मिळाल्यावर देवाजवळ आणखी काय मागावे,” असं आपल्या आमदार पतीचं नाव घेताना रेखा यांनी म्हटलं होतं.


bottom of page