top of page

मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक :निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध जोरदार टीका केली जात आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी शिवसेनेचे शिंदे गटाचे योगेश बेलदार यांच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या पुणे दौऱ्यात युपीए सरकार आणि उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे ‘तळवे’ चाटले असंही वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं. या टीकेला उत्तर देत असताना राऊत म्हणाले की, हे लोक काय चाटत आहेत. अशी चाटुगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. हे चाटुगिरीचं ढोंग आहे. टोकाची चाटुगिरी सुरू आहे. ज्यांची चाटली जात आहे, ते आम्हाला न्याय देत आहेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.


दरम्यान, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातून शिंदे गटाकडे गेलं आहे. उद्धव ठाकरेंनी या निर्णयावरून निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. तर संजय राऊत यांनी ट्वीट करून खळबळजनक आरोप केला.


bottom of page