top of page
Writer's pictureMahannewsonline

एक दिवस देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील...

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी गेले, हे पाहून खूप बरे वाटले. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी कोणीही एकमेकांचा वैयक्तिक शत्रू नसतो. ही आपल्याकडची परंपरा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस एक दिवस मातोश्रीवरही येतील, असा विश्वास मला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांना फडणवीस यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी संजय राऊत यांनी खेळीमेळीच्या वातावरणात या टीकेला प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या वेदना मला समजतात. माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली असे फडणवीसांना वाटते. ते सत्तेत येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते दु:खी आहेत. पण माझ्यावर टीका करण्यात त्यांना आनंद वाटत असेल तर त्यांनी खुशाल टीका करावी. पुढील साडेतीन वर्षे टीका करून त्यांनी आनंद घ्यावा, असा टोला राऊत यांनी लगावला.

लोकशाहीत ही टीका स्वीकारली पाहिजे. त्यांनी काय टीका केली माहिती नाही, पण त्यांनी करोना संकटात महागाई, वादळ. मदत योजना यासंदर्भात बोललं पाहिजे. विरोधी पक्षाने महाराष्ट्राच्या हितासाठी सरकारसोबत काम केलं पाहिजे,” असा सल्ला संजय राऊत यांनी दिली आहे.


“निवडणुका होतील तेव्हा एकमेकाशी लढत राहू, संघर्ष करु. लोक कौल देतील तो स्वीकारु. पण मग आता कशासाठी वाद निर्माण करत आहात?,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी गेले हे विरोध पक्ष हळूहळू जमिनीवर येत असल्याचे द्योतक आहे. एक दिवस कदाचित देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील. निवडणुका आल्यावर आपण एकमेकांवर टीका करतोच, मग आता परस्परांवर विनाकारण धुरळा कशाला उडवायचा, असेही संजय राऊत यांनी म्हटले.



bottom of page