top of page
Writer's pictureMahannewsonline

शिवसेनेचे मंत्री आणि आमदार तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमदार… सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरसह मुंबई येथील निवासस्थानी काल ईडीने छापे मारल्यानंतर आज देशमुख यांचे पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावलं असून त्यांंना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर कडाडून टीका केली. यावेळी सरकारमध्ये असलेल्या पक्षातील लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले,”शरद पवार यांनी कालच सांगितलं की, ‘निराशेतून हे केलं जात आहे. काही लोकांच्या मनात निराशा आहे. सरकार बनवू शकलो नाही, या अपयशामुळे नैराश्य आलेलं आहे.’ शरद पवार अगदी बरोबर बोलले. त्याच आधार सरकारमध्ये असलेल्या पक्षातील लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रातील तपास यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करून शकते. पण, महाराष्ट्रातील मंत्री असोत की, शिवसेनेचे मंत्री आणि आमदार तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमदार… सर्वांना त्रास देण्याचा प्रयत्न… पण आम्ही बघून घेऊ,” असं संजय राऊत म्हणाले.

“देशात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी बनण्याची तयारी सुरू आहे. पण ही आघाडी काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. काँग्रेस असल्याशिवाय विरोधी पक्षांची आघाडी आकार घेऊ शकत नाही. शरद पवार यांचंही असंच म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेनं सुद्धा हेच म्हटलेलं आहे. काँग्रेसचे नेते दिनेश गुंडू राव यांनीही काल बोलताना शिवसेनेच्या भूमिकेचाच संदर्भ दिला आहे. देशातील विरोधक एकत्र आले, अर्थात काँग्रेससह तरच देशात सध्याच्या राजकीय व्यवस्थेत चांगला पर्याय उभा राहू शकतो,” असं मत राऊत यांनी मांडलं.


bottom of page