top of page
Writer's pictureMahannewsonline

मराठा आरक्षण प्रश्नी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा...

मराठा आरक्षणावरुन भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी आपण महाराष्ट्राचा दौरा करणार असून नेमकी परिस्थिती समजून घेणार आहोत, तसंच राजकीय नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार संभाजीराजे आज ( गुरुवारी) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. संभाजीराजे आणि शरद पवार यांच्यात १५ मिनिटं चर्चा झाली. "मराठा समाज अस्वस्थ आहे, त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं शरद पवार यांना सांगितलं आहे", असे बैठकीनंतर संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

संभाजीराजे यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगत सर्व नेत्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्र सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत, त्यासाठी केंद्राकडे जाण्याची गरज नाही यावरही शऱद पवारांशी चर्चा झाली असल्याचं सांगितले.


पवारसाहेब, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या सर्वांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे, ही सकल मराठा समाजाच्यावतीने मागणी केली असल्याचे संभाजी राजे यांनी यावेळी सांगितले.


bottom of page