top of page

खोटी कारवाई..खोटे पुरावे.... मरेन पण शरण जाणार नाही

ईडीच्या छाप्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांचे ट्वीट

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळीच ईडीचे पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणी राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. ईडीकडून चौकशी आणि छापेमारी सुरू असताना संजय राऊत यांनी ट्वीट करत "खोटी कारवाई..खोटे पुरावे ... मी शिवसेना सोडणार नाही.... मरेन पण शरण जाणार नाही... जय महाराष्ट्र", असे म्हंटल आहे.

यापूर्वीही संजय राऊत यांना ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणे टाळले होते. त्यामुळे आता ईडी थेट राऊत यांच्या यांच्या घरी पोहोचले आहेत. त्यानंतर तासाभरानंतर संजय राऊत यांनी तीन ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

"कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय..मी शिवसेनेसाठी लढत राहीन." असं त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.


bottom of page