top of page
Writer's pictureMahannewsonline

संजय राऊत यांचा सुप्रिया सुळेंसोबत डान्स; VIDEO पाहा ...


शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊतचं सोमवारी २९ नोव्हेंबरला लग्न होणार आहे. पूर्वशी-मल्हार यांच्या विवाहाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात वधूपिता संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला. दोघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये हा संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळे यांचं कुटुंबही हजर होतं. यावेळी सुप्रिया सुळेंनी केलेल्या आग्रहास्तव संजय राऊत यांनी ठेका धरत डान्स केला. यावेळी त्यांच्या पत्नी वर्षा राऊतदेखील उपस्थित होत्या. सुप्रिया सुळेंनी आग्रह केल्यानंतर त्यांनीदेखील डान्स करत आनंद लुटला.



bottom of page