top of page
Writer's pictureMahannewsonline

आपल्यामुळे एखादा माणूस प्रसिद्ध होत असेल तर ....

सुप्रिया सुळे यांनी लगावला किरीट सोमय्या यांना टोला

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पवार कुटुंबियांवर केलेल्या आरोपावर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय. “आम्हाला आरोपांची सवय आहे. आमच्याविरोधात ट्रक भरून पुरावे होते. त्यांचं काय झालं? हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. चंद्रपुरात आज

राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमचं सरकार दडपशाहीचं सरकार नाहीये. या देशात कुणीही काही करत असेल तर त्याला चिंता असावी, ज्यानं काही केलं नाही त्याला चिंता नाही. मला आधी लहान असताना या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा. जसंजसं वय वाढत गेलं तसं लक्षात आलं हे खोटे आरोप जेव्हा करतात तेव्हा त्या लोकांना खूप प्रसिद्धी मिळते. आपल्यामुळे एखादा माणूस प्रसिद्ध होत असेल तर ही किती आनंदाची गोष्ट आहे,” अशा शब्दात सोमय्याचे नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. आम्ही चौकशींना घाबरत नाही, तसेही ईडी आणि पाऊस राष्ट्रवादीसाठी लाभदायक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.


bottom of page