top of page

दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'या’ वेबसाइटवर बघू शकता निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या १७ जून २०२२ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्हिडिओ ट्वीट करत माहिती दिली आहे.

‘या’ वेबसाइटवर बघू शकता निकाल

रोल नंबर आणि आईचे नाव वापरून विद्यार्थी बोर्डाच्या वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात.


ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अशी देखील माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

bottom of page