top of page
Writer's pictureMahannewsonline

दहावीच्या निकाल जाहीर; पण वेबसाईटच ओपन होत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालक त्रस्त

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज, शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. सर्वात जास्त निकाल १०० टक्के कोकण विभागाचा लागला असून सर्वांत कमी निकाल ९९.८४ टक्के नागपूर विभागाचा आहे. शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन पाहता येणार होता. परंतु दहावी निकालाच्या दोन्ही वेबसाईट अजूनही ओपन होत नाहीत. निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे.

दहावीच्या निकालाच्या result.mh-ssc.ac.in आणि mahahsscboard.in या वेबसाईट सुरुवातीला डाऊन होत्या. मात्र थोड्यावेळापूर्वी त्या पुन्हा त्या सुरु झाल्या होत्या. पुन्हा काही वेळानंतर त्या पुन्हा डाऊन झाल्या. लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक एकाच वेळी निकाल पाहत असल्याने या साईटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आल्याने हा प्रकार झाला आहे. result.mh-ssc.ac.in ही वेबसाईट ओपन केली असता The service is unavailable.असा मेसेज येत असल्याने विद्यार्थीसह पालक त्रस्त झाले आहेत.

दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावी चा निकाल जाहीर आज शुक्रवारी जाहीर करण्यात आला. सर्वात जास्त निकाल १०० टक्के कोकण विभागाचा लागला असून सर्वांत कमी निकाल ९९.८४ टक्के नागपूर विभागाचा आहे. यापैकी कोकण विभागाचा १०० टक्के, अमरावती ९९.९८ टक्के, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, लातूर या विभागांचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.९२ टक्के तर सर्वात कमी ९९.८४ टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.


bottom of page