top of page

सुश्मिता सेन-ललित मोदी यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा; ललित मोदींनी केला खुलासा, म्हणाले…

ललित मोदींनी सुष्मिता सेनचा बेटरहाफ म्हणून उल्लेख करत नव्या आयुष्याची सुरुवात करीत असल्याचंही ट्विट केले. त्यानंतर अभिनेत्री सुश्मिता सेन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी लग्न केल्याची जोरदार चर्चा रंगली. काही प्रसारमाध्यांनी तर दोघांच्या लग्नाच्या बातम्याही प्रकाशित केल्या. यानंतर स्वतः ललित मोदी यांनी लंडनहून ट्वीट करत याबाबत खुलासा केला आहे. ललित मोदी यांनी आम्ही दोघांनी लग्न केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. तसेच आम्ही सध्या एकमेकांना ‘डेट’ करत आहोत, अशी कबुली दिली.

“माझ्या लग्नाबाबतच्या वृत्तावर स्पष्टीकरण देण्यासाठी हे ट्वीट करत आहे. आम्ही लग्न केलेलं नाही. सध्या आम्ही केवळ एकमेकांना ‘डेट’ करत आहोत. एक दिवस लग्न देखील होईल.”, असं ललित मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले,

या पूर्वीच्या ट्विटमध्ये ललित मोदी यांनी स्वतः सुश्मिता सेनला ‘बेटर हाफ’ म्हणत तिच्यासोबतचे काही फोटो शेअर केले होते. त्या ट्वीटमध्ये ललित मोदी म्हणाले, “कुटुंबासोबत मालदीव, सार्दानियाच्या दौऱ्यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही.”

ललित मोदी यांच्या या ट्विटनंतर सुष्मिता आणि ललित मोदीच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होता. लग्न झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या. यानंतरच ललित मोदी यांनी आणखी एक ट्वीट करत लग्नाच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं. तसेच आम्ही केवळ एकमेकांना डेट करत आहोत, लग्न झालेलं नाही. एकदिवस लग्नही होईल, असं स्पष्टीकरण दिलं


bottom of page