top of page

एसटी कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल ...

आज सकाळी एका एसटी कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. वेळेवर पगार न झल्यानं त्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, आत्महत्या मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृतदेह कवठेमहांकाळ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे.


भीमराव सूर्यवंशी असं या कर्मचाऱ्याचं नाव असून ते कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर काम करत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले .



bottom of page