top of page
Writer's pictureMahannewsonline

२४ तासांत कामावर हजर व्हा अन्यथा ....

मुंबई: एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपात सामील झालेल्या रोजंदारीवरील ३५० हून अधिक एसटी कामगारांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. २४ तासांत आपल्या नियोजित कर्तव्याच्या ठिकाणी २४ तासांच्या आत हजर राहून कर्तव्य सुरु करावे, अन्यथा आपली नेमणूक तात्पुरत्या वेतनश्रेणी स्वरुपाची असून ती आपणास कोणतीही पूर्व सूचना न देता केव्हाही संपुष्टात येईल. आपण अटींचा भंग केल्यास सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.


या संपात रोजंदारीवरील कर्मचारी असून त्यांनाही कामावर परतण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. हे कर्मचारी न परतल्याने त्यांच्यावर सेवा समाप्तीच्या कारवाई करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. राज्यात सध्या सुमारे २ हजार रोजंदारीवरील कर्मचारी असून यात चालक, वाहकही आहेत. सेवा समाप्तीची कारवाई करण्यापूर्वी मंगळवारी राज्यातील ३५० हून अधिक रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. बेकायदेशीररित्या संपात सहभागी झाला असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळाचेही आर्थिक नुकसान होत असल्याचे नमूद केले आहे.


bottom of page