top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य ?, शिवसैनिकांनी भाजप नेत्याच्या तोंडाला काळं फासलं

पंढरपूर : वाढीव वीज बिलाविरोधात शुक्रवारी भाजपनं राज्यभरात आंदोलन केलं. अनेक शहरांमध्ये महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं आहे. पंढरपूरमध्येही भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. भाजपचे शिरीष कटेकर यांनी वीज बिला विरोधातील आंदोलनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. त्यामुळे शनिवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिरीष कटेकर यांच्या तोंडाला काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील प्रकार टाळला. या घटनेमुळे पंढरपूर शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान, शिरीष कटेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर उद्या पंढरपूर शहर बंद करण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात आलाय. तर दुसरीकडे भाजप आमदार राम कदम यांनी याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारने या हल्लेखोरांवर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारत त्याची जागा दाखवून देईल असा इशारा दिला आहे.

classi 2.jpg
bottom of page