top of page
Naukarivishayak.jpg
classi 1.jpg
Mahanews_edited.jpg
Mahanews_edited.jpg

भारत-इंग्लंड यांच्यातील उर्वरित टी-२० सामने होणार प्रेक्षकांविना

वाढत्या कोरोनाचा फटका भारत-इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेला बसला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले असून, तीन सामने होणार आहेत. मात्र, गुजरातमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे गुजरात क्रिकेट असोसिएशनने यापुढील तिन्ही सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

१६ मार्च, १८ मार्च आणि २० मार्च रोजी उर्वरित तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली होती. मात्र, पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने प्रेक्षकांविना सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या प्रेक्षकांनी सामन्याची तिकीट घेतलेली आहेत. त्यांना पैसे परत करण्यात येतील, असं गुजरात क्रिकेट मंडळाने म्हटलं आहे.

classi 2.jpg
bottom of page